मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीमध्ये एकूण 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत या नावांची घोषणा केली.
दरम्यान उर्वरित नावांची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या केली जाईल अशी माहिती जयंत पाटील यांच्याकडून यावेळी देण्यात आली.
कोणाला दिली उमेदवारी?
1. करंजा – ज्ञायक पटणी
2. हिंगणघाट – अतुल वांदिले
3. हिंगणा – रमेश बंग
4. अणुशक्तीनगर – फहाद अहमद
5. चिंचवड – राहुल कलाटे
6. भोसरी – अजित गव्हाणे
7. माजलगाव – मोहन बाजीराव जगताप
8. परळी – राजेसाहेब देशमुख
9. मोहोळ – सिद्धी रमेश कदम