NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला? शरद पवारांच्या ‘त्या’ बैठकीकडे सर्वांची नजर!
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीची चाहूल लागली असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Politics) एकत्र येण्याच्या चर्चांना नव्याने उधाण आले आहे.

NCP Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीची चाहूल लागली असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Politics) एकत्र येण्याच्या चर्चांना नव्याने उधाण आले आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी दोन्ही गट एकत्र येण्याची जोरदार शक्यता वर्तवली जात असताना अचानक या घडामोडींना ब्रेक लागला होता.
मात्र, आता या संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची आणि नवी अपडेट समोर (NCP Politics) आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या महिन्याच्या अखेरीस कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली असून, या बैठकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर आणि विलीनीकरणाच्या शक्यतेवर सखोल चर्चा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
२९ ऑगस्टला ठरणार पुढील दिशा?
अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अनेकदा चर्चा रंगल्या, दावे-प्रतिदावे झाले; परंतु निष्पन्न काहीच झाले नाही. भाजपसोबत जुळवून घ्यायचे की महाविकास आघाडीसोबत कायम राहायचे, यावर पक्षांतर्गत अनेक मतप्रवाह आणि राजकीय अंडरकरंट्स पाहायला मिळाले. चालू महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय पातळीवर अनेक गुप्त खलबते आणि भेटीगाठींचे सत्र पार पडले होते.
पावसाळी अधिवेशन शांततेत संपले असले तरी आता २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. या बैठकीत पक्षाची आगामी रणनीती आणि विलीनीकरणाचा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
एनडीए प्रवेशाच्या चर्चा आणि पडद्यामागील हालचाली
शरद पवारांचा गट एनडीएच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सुरू आहेत. पक्षातील खासदार आणि ज्येष्ठ नेत्यांनी हे दावे वारंवार फेटाळले असले, तरी पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडी वेगळेच संकेत देत आहेत.
जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची गुप्त भेट, शरद पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेली पवारांची भेट यांमुळे राजकीय चर्चांना अधिकच पेव फुटले आहे.
संसदेत मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला विधेयकाबाबत (NCP Politics) पक्षाची भूमिका काय असावी, यावरही चर्चा रंगली होती. पावसाळी अधिवेशनातील विरोधकांची कोंडी आणि आगामी हिवाळी अधिवेशनाची पार्श्वभूमी पाहता, २९ ऑगस्टच्या या बैठकीत शरद पवार कोणता अंतिम निर्णय घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.






