शरद पवार यांनी घेतली बापट यांची भेट
Updated On:

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात खासदार गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या हे देखील उपस्थित होते.
श्वसनाला त्रास होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून बापट हे दीनानाथ मध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची माहिती मिळाल्यानंतर पवार यांनी दीनानाथ मध्ये जाऊन बापट यांची भेट घेतली.
तसेटच उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही पवार यांनी चर्चा केली. श्वसनाचा त्रास असल्याने तुम्ही जास्त बोलू नका, असा सल्लाही पवार यांनी बापट यांना दिला.




