“कृपा करुन या दहशतीमधून बाहेर पडा” ; मस्साजोगमध्ये शरद पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट ; गावकऱ्यांना दिला धीर

Sharad Pawar in Massajog । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्य हादरून गेला आहे. या हत्येचे पडसाद देखील राजकीय वर्तुळात पडले. या हत्या प्रकरणाने यंदाचे हिवाळी अधिवेशनही गाजले. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोग या गावी जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी यावेळी देशमुख कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना धीर दिला.
“कृपा करुन दहशतीमधून बाहेर पडा” Sharad Pawar in Massajog ।
आज मस्साजोग गावात शरद पवार यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर,माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मस्साजोग गावात सध्या प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. कृपा करुन या दहशतीमधून बाहेर पडा. या सगळ्याला आपण मिळून तोंड देऊ. एकदा सगळ्यांनी सामूहिक प्रयत्नांची भूमिका घेतल्यावर आपल्याला कोणी अडवू शकत नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार, बीडचे लोकप्रतिनिधी, वकील मंडळी आणि जिल्ह्यातील व राज्यातील लोक तुमचे हितचिंतक म्हणून गावकरी आणि देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी आहेत,” अशा शब्दांत गावकऱ्यांना धीर दिला.
शरद पवार यांनी आज खासदार बजरंग सोनावणे, निलेश लंके,राजेश टोपे आणि संदीप क्षीरसागर यांच्यासह मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर शरद पवार यांनी गावकऱ्यांशी जाहीरपणे संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी मस्साजोग गावातील जनतेला धीर देत संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खोलात जाऊन तपास करण्याची गरज व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने आर्थिक मदत केली आहे. पण या मदतीने दु:ख कमी होत नाही. त्यामुळे या हत्याप्रकरणाच्या खोलात जाऊन सूत्रधारांना तातडीने धडा शिकवला पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.
ही घटना राज्याला न शोभणारी Sharad Pawar in Massajog ।
मी इकडे आलो याचं कारण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडलेली गोष्ट ही राज्याला न शोभणारी आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय दिला पाहिजे. ते दु:खी आहेत. आपण त्यांच्यासोबत आहोत. पण येथील स्थिती कशी दुरुस्त होईल, याची काळजी आपण घेतली पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले.
हेही वाचा
“खासदारांची अशी ऍक्टिंग कधीच पाहिली नाही” ; संजय राऊतांनी संसदेत झालेल्या गोंधळावर दिली प्रतिक्रिया





