Sharad Pawar: 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक! शरद पवार म्हणतात, “हा विषय बदलापूर पुरता मर्यादित नाही…’

Sharad Pawar On Maharashtra Bandh। बदलापूर प्रकरणावरून राज्यात सर्वत्र सध्या संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणाचा निषेध म्हणून उद्या विरोधी पक्षाकडून बंद पुकारण्यात आला आहे. याच बंदविषयी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.
याविषयी बोलताना त्यांनी उद्याचा संप हा संस्कृतीविरुद्ध विकृती असा असल्याचे म्हटले आहे. तसेच उद्याचा बंद जनतेचा उद्रेक आणि राग व्यक्त करण्यासाठी आहे. नागरिकांनी शांततेनं बंद पाळावं, असं आवाहन शरद पवारांनी केलंय.
उद्या बंद विषयी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘हा विषय बदलापूर पुरता मर्यादित नाही. अनेक गोष्टी होत आहेत, मुलींवर अत्याचार, बालिकांवर अत्याचार होत आहेत. या घटना वाढत आहेत. लोकांच्या मनात राग आहे उद्रेक आहे,
संघर्षाची भूमिका घेण्याऐवजी एक दिवसाचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रश्नांची आस्था असलेला प्रत्येक घटक यात सहभागी व्हावा. शांततेच्या मार्गाने बंद पाळला जाणार आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय.
ते पुढे म्हणाले की, “पोलिस दलाने अधिक संवेदनशीलतेने काम केलं पाहिजे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर खटले दाखल करण योग्य नाही. गृहखात्याने संवेदनशील व्हावे या घटना वाढत आहेत, थांबत नाही. कायदा सुव्यवस्था यंत्रणा जागरूक करावी लागेल. कोणाला दोष देत नाही. सगळ्यांनी शांततेत काम करावं’ असंही शरद पवारांनी म्हटलंय.
‘दुपारी दोनपर्यंत कडकडीत बंद पाळा’ – उद्धव ठाकरे
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले,”उद्याचा बंद हा महाराष्ट्राच्या जनेतसाठी आहे. हा बंद विकृती विरोधी संस्कृती आहे. बऱ्याच पालकांना आपले मुलं शाळेत सुरक्षित आहे का? याची भीती वाटत आहे. याला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद आहे.
उद्याचा बंद महाविकास आघाडीतर्फेच नाही तर सर्व जनतेचा बंद आहे. सर्वांना या बंदात सहभागी व्हा, तसेच उद्याचा बंद कडकडीत असावा बंद काळात ज्या अत्यावश्यक सेवा आहे त्या चालू राहतील. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळावा. दुकानदारांनाही उद्या बंद पाळावा,” असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.
हे देखील नक्की वाचा….
“उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ संस्कृती विरुद्ध विकृती” ; उद्धव ठाकरेंचे सर्वांना आवाहन





