ईव्हीएम मशीनला हार घालणं शांतीगिरी महाराजांना महागात पडले ; गुन्हा दाखल

Shantigiri Maharaj filed case । लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघासाठी मतदान होत आहे. त्यातीलच नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी सकाळीच मतदान केले. परंतु, या तिन्ही उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यावर सध्या आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रवर मतदान केले. मतदान केले. मात्र त्यानंतर शांतिगिरी महाराजांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला. त्या आधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पुजा करून वंदन केले होते. हा आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातील घटनेची माहिती मागवली होती.
शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल Shantigiri Maharaj filed case ।
त्यानुसार आता शांतीगिरी महाराजांवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्र्यंबकेश्वर मधील मतदान केंद्रातील मतदान कक्षावर गळ्यातील हार टाकणे शांतीगिरी महाराजांना चांगेलच महागात पडले आहे. दरम्यान, शांतीगिरी महाराजांच्या सहकाऱ्याला मतदान केंद्रावर चिठ्ठ्या वाटताना म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर अंबडच्या हद्दीत कार्यकर्त्यांच्या कुर्त्यांवर जय बाबाजी असा शब्द लिहिल्याने पोलिसांनी यावर आक्षेप घेतला.
ईव्हीएममध्ये पण देव Shantigiri Maharaj filed case ।
मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शांतीगिरी महाराज यांनी,”आम्ही सर्वात देव बघतो, ईव्हीएममध्ये पण देव आहे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले. त्या आधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पूजाकरून वंदन केले हा आदर्श आचारसंहिते उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र मतदान केंद्र हे पवित्र ठिकाण असून आम्ही शुद्ध भावनेतून पूजा केल्याचे” शांतीगिरी महाराज यांनी सांगितले.





