Shankar Mandekar : आ. शंकर मांडेकर यांच्या कडून मुळशी तहसील इमारतीच्या बांधकामाची पाहणी

मुळशी : महाराष्ट्र दिनानिमित्त मुळशी तहसील कार्यालयासमोरील श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले. यानंतर त्यांनी मुळशी येथील नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली.पाहणीवेळी इमारतीतील विविध कार्यालयांचा आढावा घेण्यात आला.
अर्धवट बांधकामाची तपासणी करून मांडेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना कोणताही अडथळा न होता सेवा मिळावी, याची काळजी घेण्याचेही त्यांनी निर्देश दिले. तहसील परिसरात पौड पोलीस स्टेशनच्या जुन्या अपघाती वाहनांमुळे अडथळा निर्माण होत असल्याने, याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून लवकरच विल्हेवाटीचा निर्णय घेण्याचे आश्वासन मांडेकर यांनी दिले. तसेच, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, PMRDA आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त बैठक घेऊन पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची अर्धवट कामे पूर्ण करण्याबाबत सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार रणजित भोसले, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, महसूल नायब तहसीलदार अमित कदम, अजय सावंत, बंडू कुबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, गट विकास अधिकारी विकास भागवत, बांधकाम विभागाचे उपअभियंता मधुकर भिंगारदिवे, सब-रजिस्ट्रार मधुकर क्षीरसागर, राजाभाऊ वाघ, विनायक ठोंबरे, दीपक करंजावणे, जगदीश लांडगे, संजय ढोरे आणि काही ग्रामस्थ उपस्थित होते.





