Shankar Mandekar – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्या उमेदवारांना अधिकृत उमेदवारी दिली आहे, त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. आपल्या भागाचा विकास करताना निधीची कुठेही कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासक प्रतिपादन भोर मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी केले. जोगवडी (ता. भोर) येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.कामथडी-भोंगवली या जिल्हा परिषद गटामध्ये पक्षाकडून विक्रम खुटवड तसेच कामथडी पंचायत समिती गणासाठी तृप्ती खुटवड व भोंगवली पंचायत समिती गणासाठी गणेश निगडे हे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी जोगवडी येथे प्रचार सभा घेण्यात आली. प्रचार सभेची सुरुवात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या ‘अजितदादा अमर रहे’ च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी सभेचे प्रास्ताविक बबन धुमाळ यांनी केले.यादरम्यान भालचंद्र जगताप, तृप्ती खुटवड, विक्रम खुटवड, शांताराम गोरड, सागर धुमाळ, अविनाश कुऱ्हाडे, जिल्हा परिषद पुणे लव्हाजी मालुसरे, अजय मालुसरे, विजय पानसरे, लालासो बांदल, बाजीराव गायकवाड या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी विठ्ठल धुमाळ, पप्पू धुमाळ, सिद्धार्थ टापरे, उदय शिंदे, सारिका मालुसरे, धनश्री मालुसरे, तात्यासाहेब भिंताडे, गोकुळ धुमाळ, अमोल धाडवे, समीर धुमाळ, नथुराम गायकवाड, प्रमोद बांदल तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच व विकास सोसायटीचे आजी-माजी चेअरमन उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा परिषद उमेदवार विक्रम खुटवड भावूक झाले. ते म्हणाले की, मला उमेदवारी मिळू नये यासाठी विरोधकांनी मोठे षडयंत्र रचले होते. मात्र, अजित पवार प्रत्यक्ष सर्वे करून लोकांचा कौल जाणून घेतला. जनतेच्या पाठिंब्यामुळेच दादांनी माझ्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. कोरोना काळात केलेल्या ३० हजार मास्क आणि आरोग्य किटच्या वाटपाचा उल्लेख करत त्यांनी आपल्या कामाचा पाढा वाचला.