राकेश बापटसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शमिता शेट्टी करते ‘या’ अभिनेत्याला डेट?

मुंबई – अभिनेत्री शमिता शेट्टीने वयाच्या 44 वर्षात देखील अद्याप लग्न केलेले नाही. मात्र तिचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले. बॉलीवूडमध्ये तिला फारसे यश मिळू शकले नाही. मात्र नुकतीच ती बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. यावेळी अभिनेता राकेश बापट आणि शमिताच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर अनेदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले. मात्र त्यांचे नाते फार टिकू शकले नाही. त्यानंतर शमिता प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आमिर अलीला डेट करत असल्याचे बोलले जात आहे.
एका मुलाखतीत आमिर याने शमितासोबत असलेल्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमिर अली म्हणाला, ‘मी जेव्हा कोणासोबत बाहेर जातो, तेव्हा माझ्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगलेल्या असतात. मी सिंगल आहे याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही माझं नाव कोणासोबतही जोडताल. मला आठवतं की मी माझ्या काही मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेलो होतो आणि त्याच रेस्टॉरंटमध्ये भारतीय संघ कोणाचा तरी वाढदिवस साजरा करत होता. तेव्हा माझी एक मैत्रीण मला (शमिता शेट्टी) भेटली. तिला सोडण्यासाठी मी बाहेर आलो. अचानक दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राने मला कॉल केला आणि सांगितले की तू तिला डेट करत आहे का विचारले? तेव्हा त्याने मला यूट्यूब लिंक देखील पाठवली.’
View this post on Instagram
पुढे तो म्हणाला, ‘मी सिंगल आहे, हे मी स्पष्ट सांगतो. मी कोणालाही डेट करत नाही. आधी मला माझ्या आईची भीती वाटायची. आता मला एका लहान मुलांप्रमाणे आईची काळजी घ्यावी लागते. मी आणि शमिता एकत्र सिनेमे पाहयचो. पण सतत रंगत असलेल्या रिलेशनशिपच्या चर्चांनंतर सर्वकाही बंद झालं आहे. आता या सर्व गोष्टींबद्दल मी जास्त विचार करत नाही.’ दरम्यान, आमिर अलीचे अभिनेत्री संजीदा शेख हिच्यासोबत घटस्फोट झाला आहे. त्यांना एक मुलगी आहे. आता तिचा सांभाळ संजीदा शेख करते. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून संजीदा हर्षवर्धन राणेला डेट करत असल्याचीही चर्चा होत आहे.





