Shambhuraj Desai : सात जागा जिंकल्या, मग अघोरी बाबाकडे जाण्याची गरज काय?; शंभूराज देसाईंचा मकरंद पाटलांना टोला
Shambhuraj Desai : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय घडामोडींवरून महायुतीतील मित्रपक्षांमध्येच शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळत आहे.

Shambhuraj Desai : महायुतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून आल्याबद्दल आम्ही सर्वजण आनंदी आहोत. महायुतीतील सर्व पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत ११ जागांपैकी सात जागा आम्ही निवडून आणल्या आहेत. (Shambhuraj Desai)
त्यामुळे विजयासाठी अघोरी बाबाकडे जाण्याची गरज काय? असा खोचक सवाल करत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला लगावला. (Shambhuraj Desai)
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत पत्रकारांनी जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय घडामोडींवर प्रश्न विचारला असता देसाई बोलत होते. (Shambhuraj Desai)
देसाई म्हणाले, महायुतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झाल्यामुळे आम्ही सर्वजण आनंदी आहोत. महायुतीतील सर्व पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत. दबावाची भाषा आम्ही कधीच करणार नाही. सुरुवातीला या राजकीय विषयावर मला बोलायचे नव्हते. मात्र, वारंवार प्रश्न विचारले जात असल्याने वस्तुस्थिती सांगणे आवश्यक आहे. (Shambhuraj Desai)
जिल्हा परिषद निवडणुकीतील ११ जागांपैकी सात जागांवर आम्ही विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील तालुकास्तरावरही मतदारांनी मतदानातून कौल दिला आहे. मग हे यश कसे मिळाले, याचा विचार केला पाहिजे. अघोरी बाबा कुठे मिळतो, हे तुम्ही त्यांना विचारा; माझ्यावर त्यांचा प्रयोग लागू पडत असेल तर मीही त्याची माहिती घेईन, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. (Shambhuraj Desai)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मकरंद पाटील हे मंत्रिमंडळातील माझे सहकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी थेट काही बोलणार नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. (Shambhuraj Desai)
Shambhuraj Desai : ‘500 कोटींच्या आरोपाची फॉरेन्सिक चौकशी करा’; मंत्री शंभूराज देसाई यांची मागणी




