या टीझरमध्ये तिने शकुंतला देवींची माहीतीही दिली होती. या लुकमध्ये बॉबकटे हेअर स्टाईल आणि साडीमध्ये विद्या अगदी शकुंतल देवींसारखीच दिसते आहे. तर आता या चित्रपटाची रिलीज डेट इंस्टाग्रामवर हटके अंदाजात शेअर केली आहे. शकुंतला देवी या लेखिका आणि मेंटल कॅल्क्युलेटर होत्या. त्या कॅल्क्युलेटर शिवाय कोणतेही गणित सहज सोडवू शकत असायच्या. अशाच काही कॅल्क्युलेटर पद्धतीच्या वापर करत तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये थेट प्रेक्षकांना प्रश्न विचारला आहे की, या तारखेपासून केवळ १४८ दिवसात हा चित्रपट रिलीज होणार आहे. अस म्हणत कोड्यात प्रश्नही विचारला आहे.
\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
A post shared by Vidya Balan (@balanvidya) on
\n
\nदरम्यान, विद्याने कोड्यात प्रश्न विचारत पुढे या चित्रपटाची ८ मे २०२० रिलीज देत सांगितली आहे, शकुंतला देवी या लेखिका आणि मेंटल कॅल्क्युलेटर होत्या. त्या कॅल्क्युलेटर शिवाय कोणतेही गणित सहज सोडवू शकत असायच्या.त्यांच्या या अलौकिक क्षमतेमुळेच त्यांना “ह्युमन कॉम्प्युटर’ असे म्हटले जात असायचे. त्यांच्या या क्षमतेमुळे त्यांचे नाव गिनिज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्येही नोंदवले गेले होते. त्यांच्यावरील सिनेमा करायचे जेंव्हा ठरले तेंव्हा विद्या बालनला तो रोल द्यायचा, असेच ठरवले गेले होते.
\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
A post shared by Vidya Balan (@balanvidya) on
\n
\nअनु मेनन या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाच्या तयारीसाठी विद्याने मुद्दाम बॉब कट करून घेतला आहे. गणिताची समिकरणे तोंडी सोडवण्याचीही ती सवय करते आहे. स्क्रीप्टमध्ये तिच्यासाठीच्या रोलनुसार शकुंतला देवी बनण्यासाठी दिसण्याबरोबरच गणिताची अधिक तोंडओळख करण्याचाही ती सराव करते आहे.