शक्तिपीठनंतर भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाला लागला ब्रेक

मुंबई : शक्तिपीठ महामार्गापाठोपाठ आता भक्तीपीठ महामार्ग आणि औद्योगिक महामार्गाला ब्रेक लागला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केल्याने सरकारला या महामार्गाचे भूसंपादन थांबवावे लागले आहे. नागपूर गोवा असा शक्तिपीठ महामार्ग होणार होता. पुणे नाशिक औद्योगिक महामार्गा तर सिंदखेड राजा ते शेगाव असा भक्तीपीठ महामार्ग होणार होता. या तीन महामार्गांची जवळपास सव्वालाख कोटी रूपयांची गुंतवणूक होती. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर हे तीन महामार्ग उभारण्यात येणार होते.
सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पाला ब्रेक
शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्ग हा महायुती सरकारचा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जात होता. आता या तीन्ही महामार्गाच भूसंपादन थांबवण्यात आलं आहे. राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यामध्ये या महामार्गाची महत्वाची भूमिका होती. शेतकऱ्यांच्या विरोधानंतर राज्य सरकारला बॅकफूटवर जावे लागले आहे.
कसा होता हा महामार्ग?
नागपूर गोवा असा शक्तिपीठ महामार्ग होणार होता. पुणे नाशिक औद्योगिक महामार्गा तर सिंदखेड राजा ते शेगाव असा भक्तीपीठ महामार्ग होणार होता. बुलढाण्यातील शेतकऱ्यांनी विरोध केल्याने ‘भक्तीपीठ महामार्ग’ रद्द करण्यात आला आहे.





