Shakti Mohan: “लग्न आणि मुलं नकोच!”… चाळीशीतही ठाम निर्णय; शक्ती मोहनने भूतकाळातील फसवणुकीवर केला खुलासा
Shakti Mohan डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोची विजेती ठरल्यापासून शक्ती मोहनने आपल्या मेहनतीने मोठं नाव कमावलं आहे. आज ती एक यशस्वी कोरिओग्राफर, डान्स शोची परीक्षक आणि स्वतःचा डान्स स्टुडिओ चालवणारी उद्योजिका आहे. त्यामुळे ती आपल्या कामात पूर्णपणे समाधानी असल्याचं ती सांगते.

Shakti Mohan: प्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर शक्ती मोहन (Shakti Mohan) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी केलेल्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. चाळीशीत पोहोचूनही तिने लग्न न करण्याचा आणि स्वतःची मुलं न होऊ देण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामागचं कारण म्हणजे तिच्या भूतकाळातील एक कटू अनुभव.
डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोची विजेती ठरल्यापासून शक्ती मोहनने आपल्या मेहनतीने मोठं नाव कमावलं आहे. आज ती एक यशस्वी कोरिओग्राफर, डान्स शोची परीक्षक आणि स्वतःचा डान्स स्टुडिओ चालवणारी उद्योजिका आहे. त्यामुळे ती आपल्या कामात पूर्णपणे समाधानी असल्याचं ती सांगते.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, शक्ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने बोलली. ती म्हणाली, “लोक मला नेहमी लग्नाबद्दल विचारतात. माझे आई-वडीलही विचारतात की माझ्या आयुष्यात कोणी आहे का. पण मला वाटतं की, आयुष्यात आनंदी राहण्यासाठी कोणीतरी असायलाच हवं, हा समाजाचा गैरसमज आहे.” Shakti Mohan
ती पुढे म्हणाली, “मी माझ्या कामात खूप आनंदी आहे. माझ्या आयुष्यात काही कमी आहे असं मला अजिबात वाटत नाही. जर मला योग्य व्यक्ती भेटली, तर मी नक्कीच विचार करेन. पण फक्त समाजाच्या दबावामुळे लग्न करण्याची मला गरज वाटत नाही.” Shakti Mohan

Shakti Mohan
मुलांबाबत बोलताना शक्तीने आणखी स्पष्ट भूमिका घेतली. ती म्हणाली, “मी एक चांगली मावशी आहे आणि माझ्या भाच्यांवर खूप प्रेम करते. पण मला स्वतःची मुलं असावीत असं वाटत नाही. मला आई व्हायचं नाही.”
तिच्या या निर्णयामागे तिच्या भूतकाळातील रिलेशनशिपचा मोठा प्रभाव आहे. शक्तीने सांगितलं की, ती एका नात्यात होती, पण त्या नात्यात तिची फसवणूक झाली. “जेव्हा मला कळलं की माझा जोडीदार माझी फसवणूक करत आहे, तेव्हा मी लगेचच ते नातं संपवलं. तो अनेक वेळा माफी मागायला आला, पण मी त्याला माफ केलं नाही,” असं ती म्हणाली. Shakti Mohan
या प्रसंगामुळे ती खूप दुखावली गेली होती. “मी अनेक महिने रडत होते. फसवणूक काय असते, हे मला आधी माहिती नव्हतं. पण जेव्हा तुम्हाला असा अनुभव येतो, तेव्हा तुम्ही सगळ्यांवर संशय घेऊ लागता,” असंही तिने सांगितलं.
तिच्या आईने तिला त्या वेळी “असं होतं, ते स्वीकार” असा सल्ला दिला होता. पण शक्तीने तो स्पष्टपणे नाकारला. “ही गोष्ट मी माझ्या आयुष्यात कधीच स्वीकारणार नाही,” असं तिने ठामपणे सांगितलं.
आज शक्ती मोहन आपल्या करिअरमध्ये यशस्वी असून स्वतःच्या अटींवर आयुष्य जगत आहे. तिच्या या स्पष्ट आणि प्रामाणिक विचारांना अनेकांनी पाठिंबा दिला आहे.


