पहिल्यांदाच साडी घालून पार्टीमध्ये आली शाहरुखची मुलगी,सुहानाचा स्ट्रगल पाहून नेटकरीही भारावले Watch Video

मुंबई – शाहरुख खानप्रमाणे त्याचे कुटुंबीय देखील साडी घालूनचांगलेच चर्चेत असतात. सुहाना खानला तुम्ही अनेकदा स्टायलिश लूकमध्ये पाहिलं असेल. बोल्ड हॉट अंदाजात सुहानाचे फोटो देखील सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. सुहानाने नुकतीच एका कार्यक्रमासाठी चक्क साडी घालून हजेरी लावली.
मनीष मल्होत्राने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीमध्ये सुहानाने गोल्डन कलरची सुंदर साडी परिधान केली होती. बांधलेले केस आणि छान एअर रिग्ज यामुळे सुहानाचे सौंदर्य आणखी खुलून दिसत होते. परंतु समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सुहानाला साडीमुळे चालताना प्रचंड त्रास होत असल्याचे दिसून आले. कार्यक्रमादरम्यान फोटोजसाठी सुहानाने पोझ दिल्या खऱ्या परंतु साडीसोबत तिला खूपच स्ट्रगल करावे लागले.
View this post on Instagram
सुहानाने पहिल्यांदाच साडी घातलेली असल्यामुळे तिचा हा लूक सर्वांना भुरळ घालणारच होता. त्यामुळे पार्टीमध्ये कोणाचीही नजर तिच्यावरून हटत नव्हती. नेटकऱ्यांनी देखील यावेळी तिच्या या लूकचे कौतुक केले आहे. अनेकांनी तिला साडीतील स्ट्रगलसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींना या तिच्या लूकमुळे अभिनेत्री दीपिका पदुकोणची आठवण झाली आहे.





