छप्पर फाड कमाई सुरूच
\nबुधवारी म्हणजेच 25 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ऍडव्हान्स बुकिंगमध्ये हाऊसफुल झाल्याने चित्रपट मोठी करणार असल्याचे स्पष्ट झाले होते. पहिल्या दिवशी 57 कोटी दुसऱ्या दिवशी 70 कोटी अशी जबरदस्त ओपनिंग दिली. तिसऱ्या दिवशी कमाई जरा घसरली असली तरी शनिवारी 55 कोटी कमावल्याने कमाईचा आकडा पुन्हा वाढला आणि चित्रपट थेट दोनशे कोटी कमाईच्या घरात गेला. तर जगभरात या चित्रपटाने तब्बल तीनशे कोटींचा गल्ला पार केला आहे. रविवारी हा चित्रपट चारशे कोटींचा गल्ला पार करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.