shahrukh khan : जगभर फिरलेला किंग खान काश्मीरला का जात नाही? स्वतः सांगितलं कारण, पाहा Video

Updated On:

shahrukh khan। Pahalgam Attack – ‘काश्मीर…’ एक असे ठिकाण ज्याला लोक पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात. दरवर्षी लाखो लोक या ठिकाणाचे सौंदर्य पाहण्यासाठी येतात. बर्फाच्छादित पर्वत, निळे तलाव, हिरवळ आणि शांत वातावरण. पण आज या स्वर्गात भीती पसरली आहे. अलिकडेच, काश्मीरमधील पहलगाम येथे एक मोठा दहशतवादी हल्ला झाला असून जिथे २६ निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले.

या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटन उद्योगाची अवस्था वाईट झाली आहे. पहलगाम हल्ल्याचा सर्वात मोठा परिणाम काश्मीरमधील लोकांवर, दुकानदारांवर, हॉटेल मालकांवर, गाईडवर आणि पर्यटनावर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वांवर झाला आहे. भीतीमुळे पर्यटक त्यांचे दौरे रद्द करत असून या स्वर्गाकडे सर्वांनी पाठ फिरली आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का? बॉलिवूडच्या किंग खानने अजून एकदाही पृथ्वीवरील या स्वर्गाला भेट दिली नाही. स्वतः शाहरुख खानने याबद्दल सांगितलं आहे. अभिनयाव्यतिरिक्त, शाहरुख खान त्याच्या कुटुंबावरील प्रेमासाठी आणि त्याच्या पालकांशी असलेल्या भावनिक नात्यासाठी देखील ओळखला जातो.

एका कार्यक्रमादरम्यान शाहरूख खानने एक भावनिक घटना सांगितली. त्यामुळेच तो आद्यापपर्यंत कधीच काश्मीरला गेला नाही. जेव्हा शाहरूख खान अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय टीव्ही शो कौन बनेगा करोडपतीमध्ये आला होता तेव्हा त्याने हा भावनिक प्रसंग सांगितला.

शाहरुखने शोमध्ये सांगितले की, त्याची आजी काश्मीरची होती, तो म्हणाला की माझ्या वडिलांनी मला आयुष्यात सांगितले होते की मला तीन ठिकाणी भेट द्यायलाच हवी इस्तंबूल, रोम आणि काश्मीर. पण त्यांनी असेही म्हटले होते की माझ्याशिवाय तुम्ही इतर दोन ठिकाणे तू पाहू शकतो. पण माझ्याशिवाय काश्मीर पाहू नको.

शाहरुख म्हणाला की, माझ्या वडिलांचे स्वप्न होते की त्यांना स्वत:ला मला सोबत घेऊन काश्मीर दाखवायचं होतं. पण त्याआधीच त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि त्या दिवसापासून शाहरुखने हे वचन पाळण्याचा निर्णय घेतला.

तो जगभर फिरला आहे पण तो कधीही काश्मीरला गेला नाही. तो म्हणाला की मला अनेक वेळा संधी मिळाल्या, मित्रांनी मला फोन केला, कुटुंब सुट्टीवर गेले पण मी कधीच गेलो नाही. कारण वडिलांनी सांगितले होते की त्यांच्याशिवाय काश्मीर पाहू नये”. शाहरुखने सांगितलेल्या या भाविनक प्रसंगामुळे प्रेक्षकही खूप भावूक झाले होते. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झाला आहे.

2012 साली काश्मीरमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं…

चित्रपट निर्माते यश चोप्रा हे शाहरुखसाठी पित्यासमान होते. ते शाहरुखला ‘जब तक है जान’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये घेऊन गेले होते. शाहरुखनं 2012 साली काश्मीरमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं. त्यावेळी शाहरुखनं ट्विटरवर लिहिलं होतं., ‘मला काश्मीरला नेण्याची वडिलांची इच्छा अपूर्ण राहिली. पण, मी आता काश्मीरमध्ये आहे. मला असं वाटतंय की मी त्यांच्या मजबूत मिठीमध्ये आहे.’ असं तो म्हणाला.

दरम्यान, त्यापूर्वी शाहरुखनं ‘दिल से ‘ या सिनेमासाठी लड्डाखमध्ये शूटिंग केलं होतं. पण, तो कधीही काश्मीरमध्ये गेलो नव्हता. त्यानंतर 2023 साली तो पुन्हा काश्मीरमध्ये गेला. त्यावेळी राजकुमार हिरानी यांच्या डंकी चित्रपटाचं सोनमर्गमध्ये होणाऱ्या शूटिंगसाठी तो काश्मीरमध्ये गेला होता.’

आणखी संबंधित बातम्या

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा