अभिनेता शाहिद कपूरचा बायकोसमोर जुन्या फ्रेंडसोबत बेफान डान्स

मुंबई – शाहिद कपूरने पत्नी मीरा राजपूतच्या 28व्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शाहिद कपूर शोले चित्रपटातील गाण्यावर मस्त डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्याचे मित्रही उपस्थित होते. ये दोस्ती हम छोडेगे या गाण्याच्या तालावर शाहिदसह त्याचे मित्रही पार्टी करताना दिसत आहेत.
व्हिडिओ शेअर करताना शाहिद कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले – पार्टी. ही पोस्ट समोर आल्यानंतर त्याच्या फॅन्स आणि मित्रांकडून अनेक कमेंट्स येऊ लागल्या आहेत. अभिनेता हृतिक रोशननेही कमेंट करून हे त्याचेही आवडते गाणे असलयाचे म्हंटले आहे. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या पार्टीमुळे अनेकांनी शाहिदचे आभार देखील मानले आहेत.
View this post on Instagram
मीराने शाहिदसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. मीराने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ घालवला असे म्हणत तिने सर्वांचे आभार मानले आहेत.शाहिदने शेअर केलेला पार्टीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. शाहिद कपूरचा शेवटचा रिलीज झालेला बॉलिवूड चित्रपट जर्सी होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही कारण त्यांनी चित्रपटाचे तामिळ व्हर्जन आधीच रिलीज केले होते.


