#Pathaan : शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमानं रचला इतिहास; 1000 कोटींच्या कलेक्शनचा टप्पा केला पार

मुंबई – शाहरुख खान च्या “पठाण” चित्रपटाने मंगळवारी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींच्या कलेक्शनचा टप्पा पार करून इतिहास घडवला आहे. हा टप्पा गाठणारा तो एकमेव हिंदी चित्रपट ठरला आहे.
या चित्रपटाने चौथ्या सोमवारी भारतात रु. 1.25 कोटी कमाई केली. या चित्रपटाची जगभरातील एकूण मिळकत ही अविश्वसनीय रु. 1000 कोटी रूपये इतकी आहे. त्यात भारतातील एकूण उत्पन्न 623 कोटी रूपये इतके असून, परदेशात या चित्रपटाने एकूण रु. 377 कोटी रूपयांचे कलेक्शन केले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/shah-rukh-salman-celebrating-bollywood-day-upsets-fundamentalists/
आजवर एकाही हिंदी चित्रपटाने इतकी मोठी कमाई केलेली नाही. त्यातही या चित्रपटाला काही धार्मिक कट्टरपंथीय संघटनांकडून विरोध होऊनही या चित्रपटाने कमाईचा नवा विक्रम नोंदवला आहे. या चित्रपटाद्वारे शाहरूख खान याने चार वर्षानंतर प्रथमच मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.





