शाहरुख खान ‘डंकी’त दिसणार आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, पुन्हा एकदा घालणार वर्दी

मुंबई – बॉलिवूड किंग खान अर्थात शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तुफान कमी केली. त्यानंतर आता त्याच्या आगामी चित्रपटाची देखील चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. लवकरच शाहरुखचे ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यापूर्वी ‘डंकी’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
‘डंकी’ या चित्रपटात शाहरुख आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या घोषणे वेळी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यात शाहरुखच्या लूकवरून तो एका लष्कर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे लक्षात येते. शाहरुखने देखील पुन्हा एकदा लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकरण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
‘डंकी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी करत आहेत. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. सध्या शाहरुख चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
शाहरुख खानने याआधी ‘फौजी’, ‘जब तक है जान’ आणि ‘मैं हूं ना’ या चित्रपटांमध्ये आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली आहे. आता पुन्हा एकदा तो या भूमिकेत दिसणार असल्याने चाहते देखील उत्सुक झाले आहेत. या चित्रपटात शाहरुख खानसोबत विकी कौशल, तापसी पन्नू आणि बोमन इराणी हे कलाकार देखील दिसणार आहे. दरम्यान, ‘पठाण’ प्रमाणे शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार हे पाहावे लागणार आहे.





