शाहरुखने रचला इतिहास; ‘हा’ पुरस्कार मिळवणारा ठरला पहिला भारतीय

हिंदी चित्रपटसृष्टीतुन एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता शाहरुख खानने इतिहास रचला आहे. त्यानं भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.शाहरुख खानचे फक्त भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. त्याच्या अभिनय आणि स्टाईलचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत.
आता शाहरुखच्या सन्मानात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला गेला आहे. शाहरुख खानला स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.यंदा 77 वा लोकार्नो चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. बॉलिवूडचा बादशाह आणि ग्लोबल स्टार बनलेल्या शाहरुख खानचा या महोत्सवात विशेष गौरव केला जाणार आहे.
शाहरुख खानला त्याच्या त्याच्या जीवनभरातील कारकिर्दीसाठी ‘पार्दो अल्ला कॅरीरा एस्कोना-लोकार्नो टूरिस्मो’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील विविध शैलीतील 100 हून अधिक चित्रपटांमध्ये योगदान दिल्याबद्दल शाहरुखला महोत्सवात लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड किंवा लेपर्ड अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. शाहरुख खानला येत्या 10 ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमधील लोकार्नो येथील प्लाझा ग्रांडे येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवात शाहरुख खानचा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.





