शाहरुखने राणी मुखर्जीसोबत शेअर केला खास व्हिडिओ; म्हणाला ‘दोघांची अर्धवट राहिलेली इच्छा पूर्ण’

Shah Rukh Khan And Rani Mukherjee | अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचे देखील खूप प्रेम मिळाले. अलिकडेच शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांना 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटासाठी तर राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी गौरवण्यात आले. यानंतर आता दोघांनी एकत्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे.इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत शाहरुखने राष्ट्रीय पुरस्काराचा उल्लेख केला आणि लेकाच्या सीरिजचे प्रमोशनही केले.
शाहरुख खानचा लेक आर्यन खान ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सीरिजमधून मनोरंजन सृष्टीत पदार्पण करणार आहे. चाहते देखील त्याची सीरिज पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. सीरिजचे ‘तू पहली तू आखरी’ टायटल ट्रॅकवर शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांनी रोमँटिक अंदाजात डान्स केला आहे. Shah Rukh Khan And Rani Mukherjee |
View this post on Instagram
शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘राष्ट्रीय पुरस्कार… आपल्या दोघांची अर्धवट राहिलेली इच्छा पूर्ण झाली आहे. अभिनंदन राणी, तू खरोखर राणी आहेस आणि माझे तुझ्यावर प्रेम नेहमीच राहील.’ Shah Rukh Khan And Rani Mukherjee |
गेल्या काही दिवसांपासून खांद्याच्या दुखापतीमुळे आर्म स्लिंगचा वापर करत आहे. मात्र मुलाचे कौतुक करण्यासाठी उत्साहाने सहभागी होत आहे. आर्यन खान दिग्दर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या नेटफ्लिक्स शोच्या प्रीव्ह्यू लॉन्च इव्हेंटचे आयोजन अलीकडेच करण्यात आलेले. त्या शोमध्येही शाहरुख सहभागी झाला होता. आर्यन खानची आगामी नेटफ्लिक्स सीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ येत्या 18 सप्टेंबर रोजी रीलिज होणार आहे. Shah Rukh Khan And Rani Mukherjee |
हेही वाचा:
Manoj Jarange : जरांगे फडणवीसांवर बरसले, थेट इशारा देत म्हणाले “आम्ही मराठ्याची औलाद…आता…”





