Shah Rukh khan : शाहरुख खानचा मजेशीर खुलासा: “उल्लू बनवला तरी चालेल, पण जीरो बनवू नका”

Shah Rukh khan: बॉलिवूडचा किंग खान आपल्या विनोदी आणि बेधडक स्वभावामुळे नेहमी चर्चेत असतो. अलीकडेच तो मुलगा आर्यन खानच्या डेब्यू वेब सीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ च्या ट्रेलर लॉन्चला उपस्थित होता. या कार्यक्रमात शाहरुखने आर्यनच्या कामाबद्दल बोलतानाच स्वतःच्या फ्लॉप ठरलेल्या ‘जीरो’ चित्रपटावर मजेशीर टिप्पणी करून सगळ्यांना हसवले.
बोलत असताना अभिनेता मनीष चौधरी म्हणाला की ते ‘जीरो’ बनवणार आहेत. त्यावर शाहरुखने लगेच उत्तर दिलं,
“सर, तुम्हाला जे काही बनवायचं आहे ते बनवा… उल्लू बनवा, गधा बनवा, मामू बनवा… पण देवाच्या दयेने माझ्यासारखा जीरो कधीही बनवू नका!”
हे ऐकताच तिथे उपस्थित सगळेच हसून लोटपोट झाले.
‘जीरो’ची कहाणी
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जीरो’ मध्ये शाहरुखने एका बुटक्या माणसाची भूमिका साकारली होती. अनुष्का शर्मा आणि कॅटरीना कैफसारखी मोठी स्टारकास्ट असूनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोसळला. या अपयशामुळे शाहरुखने जवळपास पाच वर्षे चित्रपटांपासून दूर राहायचं ठरवलं.
शाहरुखची दमदार एन्ट्री
२०२३ मध्ये शाहरुखने ‘पठाण’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून धमाकेदार पुनरागमन केलं. त्यानंतर ‘जवान’ आणि ‘डंकी’ हिट ठरल्या आणि एका वर्षात तीन मोठ्या हिट फिल्म्स देऊन त्याने पुन्हा स्टारडम मजबूत केलं.
सध्या शाहरुख आपल्या पुढील ‘किंग’ या सिनेमामुळे चर्चेत आहे, ज्यात तो पहिल्यांदाच मुलगी सुहाना खानसोबत स्क्रीनवर झळकणार आहे.
फॅन्समध्ये शाहरुखचा मजेदार अंदाज व्हायरल
शाहरुखच्या शूटिंगदरम्यान हाताला दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती. तरीही त्याचा हा मजेदार आणि मोकळा अंदाज फॅन्सना प्रचंड आवडला. सोशल मीडियावर लोक म्हणतायत, “याच बेधडक आणि मजेशीर स्वभावामुळे शाहरुख प्रत्येक पिढीचा आवडता हिरो आहे !”





