Shafali Verma Records : शफाली वर्माचे वादळ! ४ जीवदानांनंतर ठोकले अर्धशतक; एकाच डावात स्मृती मानधनाला दोनदा टाकले मागे
Shafali Verma Records : शफालीने डावाची सूत्रे हाती घेत अवघ्या ४० चेंडूंत ६४ धावांची वादळी खेळी साकारली. यासह तिने मानधनाला दोन विक्रमात मागे टाकले.

Shafali Verma Blasts 64 Runs Women Asia Cup 2026 Semifinal Surpasses Smriti Mandhana : महिला आशिया चषक २०२६ च्या (Women’s Asia Cup 2026) पहिल्या उपांत्य सामन्यात भारताची स्फोटक सलामीवीर शफाली वर्माने (Shafali Verma) बांगलादेशच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. नाणेफेक जिंकून बांगलादेशने भारताला प्रथम फलंदाजीस पाचारण केले होते. उपकर्णधार स्मृती मानधना स्वस्तात बाद झाल्यानंतर शफालीने डावाची सूत्रे हाती घेत अवघ्या ४० चेंडूंत ६४ धावांची वादळी खेळी साकारली. तिच्या या आक्रमक डावात ७ खणखणीत चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. यासह तिने मानधनाला दोन विक्रमात मागे टाकले.
एक-दोन नव्हे तब्बल ४ जीवनदाने; बांगलादेशच्या चुकांची शफालीने केली वसुली!
उपांत्य फेरीच्या या हायव्होल्टेज सामन्यात बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकांनी अक्षम्य चुका केल्या. बांगलादेशी खेळाडूंनी शफालीचे तीन झेल सोडले, तर एका धावबादेची सोपी संधीही गमावली. या चार जीवनदानांचा पुरेपूर फायदा उठवत शफालीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. तिने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत अवघ्या ३५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि भारतीय संघाला १४९ धावापर्यंत पोहोचवलं आहे.
DROP HER ONCE, SHE’LL HIT YOU FOR SIX.
DROP HER TWICE… GOOD LUCK! 😜💥
Shafali Verma was given TWO lives… and she wasted no time making Bangladesh pay! 🔥Dropped on 6… dropped again on 11…
And then came BACK-TO-BACK SIXES! 🚀💥That’s Shafali Verma for you — chances given,… pic.twitter.com/nTSLr1XNzS
— Anil Bansal (@dilseanilbansal) September 10, 2026
आशिया चषकात सर्वाधिक धावा; स्मृती मानधनाला टाकले मागे!
Shafali Varma takes the attack straight to the Bangladeshi bowlers! 💥
Watch #INDvBAN in the #DPWorldWomensAsiaCup2026 LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #NotAGentlemansGame pic.twitter.com/u4XUgJC2am
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 10, 2026
या अर्धशतकी खेळीच्या जोरावर शफाली महिला आशिया चषक २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनली आहे. तिने आतापर्यंत ४ सामन्यांच्या ४ डावांत १६८ धावा कुटल्या आहेत. या यादीत शतक ठोकणारी स्मृती मानधना ४ सामन्यांत १५४ धावांसह दुसऱ्या स्थानी घसरली आहे. बांगलादेशविरुद्धच्या एकाच डावात शफालीने धावांचा पाठलाग करत स्मृतीचा अव्वल क्रमांक हिरावून घेतला.
यंदाच्या वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ६०७ धावा; कॅलेंडर वर्षातही नंबर वन –
केवळ आशिया चषकच नाही, तर २०२६ या कॅलेंडर वर्षात महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही शफालीने आपल्या नावे केला. येथेही तिने स्मृतीला मागे टाकले. शफालीच्या खात्यात आता ६०७ धावा जमा झाल्या असून, स्मृती मानधना ५९० धावांसह दुसऱ्या तर कर्णधार हरमनप्रीत कौर ४८९ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.





