जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Updated On:

पिंपरी – घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत नात्यातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ऑक्टोबर 2018 ते 29 फेब्रुवारी 2020 या कालावधीत थेरगाव येथे घडली.
याप्रकरणी 16 वर्षीय पीडित मुलीने सोमवारी (दि. 2) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने पीडित मुलीच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन पीडित मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला.





