शिरूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; परप्रांतीय आरोपीवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना शिरूर तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात आरोपीवर पोस्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाई मंडल (रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. टाकवे ता. मावळ जि.पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलीला आरोपीने तिच्या घराजवळून लग्नाचे अमिष दाखवत चारचाकी वाहनातून तो राहत असलेल्या ठिकाणी टाकवे (ता. मावळ जि.पुणे) येथे घेवून गेला. त्यानंतर सकाळी 9 च्या सुमारास इतर लोक कामवर गेले असता पिडीत अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवत “अभी आपण दोनो शादी करणेही वाले है तो क्या प्रॉब्लेम है” असे म्हणत फिर्यादीच्या संमतीशिवाय तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
पिडीत अल्पवयीन मुलीने रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशन येथे आरोपी मंडल विरुध्द फिर्याद दिली असून बाल लैंगिक अत्याचारासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांजणगाव एम. आय. डी. सी. पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सविता काळे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.





