‘Sex Addict’ ‘डेटिंग ॲप’..पॉर्न व्हिडीओं..अन् ताकात किटकनाशक मिसळून मनोज साने केली सरस्वतीची हत्या

Updated On:
‘Sex Addict’ ‘डेटिंग ॲप’..पॉर्न व्हिडीओं..अन् ताकात किटकनाशक मिसळून मनोज साने केली सरस्वतीची हत्या

मुंबई : ठाण्यातील मीरा रोड येथील गीता नगर परिसरातील हत्या कांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे, या हत्याकांडातील आरोपी मनोज सानेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, मनोजने त्याची  लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची हत्या केली आणि नंतर मृतदेहाचे छोटे तुकडे करून ते कुत्र्यांना खाऊ घातले. पोलिसांना परिसरातील लोकांनी कळवताच स्थानिक पोलिसांनी तपास सुरु केला आणि मनोजला अटक केली.

यानंतर पोलीस चौकशीदरम्यान मनोज सानेने पोलिसांना पहिल्यांदा सांगितले,’तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे आणि त्याचे सरस्वतीसोबत कधीही शारीरिक संबंध नव्हते. तो पुढे म्हणाला की सरस्वतीशी संबंध नसण्याचे आणखी एक कारण म्हणजे ती त्यांच्या मुलीसारखी होती.’ त्यानंतर पोलिसांना चौकशीवेळी तो  सानेच्या मोबाईलमधून अनेक डेटिंग ॲपवर सक्रिय असल्याचे निष्कषास आले आणि तो सेक्सच्या आहारी गेल्याचेही कळेल. यानंतर आता पोलिसानांच्या हाती नवी माहिती समोर येत आहे.

मनोज सानेने हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. मात्र त्याने तिची हत्या कशी केली? हे आता पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस म्हणाले,’मनोज सानेने त्याची लिव्ह इन पार्टनर आणि कथित पत्नी सरस्वती वैद्यची हत्या करण्याचा कट आखला होता. त्याने बोरीवली येथील दुकानातून किटकनाशक खरेदी केलं. हे किटकनाशक ताकात मिसळून त्याने सरस्वतीला दिलं. सरस्वतीच्या हत्येप्रकरणी जेव्हा मनोजला अटक करण्यात आली त्यावेळी सरस्वतीने विष पिऊन आत्महत्या केली असं मनोज सानेने पोलिसांना सांगतिलं होत. तसंच आपण यात पकडले जाऊ म्हणून तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन नष्ट करत होतो असही तो म्हणाला होता. मात्र आता मनोजनेच सरस्वतीला ताकातून विष देऊन ठार केलं आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले असं पोलिसांनी म्हटलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Female jailer : घरकामासाठी कैद्यांना जेलबाहेर नेण्याचा आरोप; जेलरच आता त्याच तुरुंगात कैदी!

2026-10-08 19:31:12

Female jailer : घरकामासाठी कैद्यांना जेलबाहेर नेण्याचा आरोप; जेलरच आता त्याच तुरुंगात कैदी!

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

2026-10-05 19:04:28

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

2026-10-04 11:24:34

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

Pune News : झाडावर गळफास घेण्याचा प्रयत्न; अग्निशमन दलाने वाचविले

2026-10-01 18:21:04

Pune News : झाडावर गळफास घेण्याचा प्रयत्न; अग्निशमन दलाने वाचविले

Pune News : मोबाईल फॉरमॅट केल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण; राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

2026-10-01 18:16:37

Pune News : मोबाईल फॉरमॅट केल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण; राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल