Sergey Sobyanin : युक्रेनचे 28 ड्रोन रशियाकडून नष्ट; मॉस्कोच्या महापौरांनी दिली माहिती
रशियाच्या हवाई संरक्षण विभागाने रविवारी राजधानी मॉस्कोवर हल्ला करण्यासाठी निघालेली युक्रेनची २८ ड्रोन नष्ट केली. मॉस्कोचे महापौर सोबियानिन (Sergey Sobyanin) यांनी ही माहिती दिली.

Sergey Sobyanin : रशियाच्या हवाई संरक्षण विभागाने रविवारी राजधानी मॉस्कोवर हल्ला करण्यासाठी निघालेली युक्रेनची २८ ड्रोन नष्ट केली. मॉस्कोचे महापौर सोबियानिन (Sergey Sobyanin) यांनी ही माहिती दिली. मॉस्कोवर युक्रेनकडून सलग दुसऱ्या दिवशी ड्रोन हल्ला झाला आहे.
शनिवारी युक्रेनची १६ ड्रोन मॉस्कोवर हल्ला करण्यासाठी निघाली होती. रशियाच्या हवाई संरक्षण विभागाने ती पाडली होती. आज झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे झालेले नुकसान अथवा जीवितहानीबद्दलचा कोणताही तपशील महापौरानी (Sergey Sobyanin) दिला नाही.
युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमुळे राजधानी मॉस्कोच्या नैऋत्य आणि वायव्येकडील वनुकोवो आणि शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळांचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे, अशी घोषणा नागरी विमान वाहतूक एजन्सी रोसावियात्सियाने केली.
शनिवारी देखील, राजधानीतील चार स्थानिक विमानतळांपैकी वनुकोवो, डोमोडेदोवो आणि झुकोव्स्की या ३ विमानतळांवरील कामकाज काही तासांसाठी स्थगित केले गेले होते. त्यामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली होती. मॉस्कोजवळ येताच ४७ ड्रोन नष्ट करण्यात आली असल्याचे शनिवारी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते.






