Tokyo Olympics : ब्रिटनचे सहा खेळाडू विलगीकरणात

टोकियो – टोकियोला जात असलेल्या विमानातील सहप्रवाशाला करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर ब्रिटनच्या ऑलिम्पिक पथकातील सहा खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील दोन कर्मचाऱ्यांना विलगीकरणात पाठवण्यात आले आहे.
पुढील 48 तासांत या खेळाडूंचे दोन्ही करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले तरच त्यांना सराव करण्याची परवानगी मिळणार आहे. योकोहोमा येथे दाखल झाल्यानंतर या खेळाडूंनी सरावही केला.
पण सहप्रवाशाला करोनाची बाधा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या या सहाही खेळाडूंना तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या हॉटेलच्या रूममध्येच विलगीकरणात राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
विमानतळावर सर्व खेळाडूंचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. योकोहोमामध्ये दाखल झाल्यानंतरही खेळाडूंची चाचणी निगेटिव्हच आली होती. आता हे सर्व खेळाडू ब्रिटन वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहेत.





