Stock market : चढ-उतारानंतर शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 354 अंकांनी घसरला, निफ्टी 21750 च्या खाली
Updated On:

Stock market : अस्थिर व्यवहारादरम्यान सोमवारी शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग दिसून आले. या कालावधीत बाजारातील प्रमुख बेंचमार्क निर्देशांक किंचित वाढीसह उघडूनही घसरणीसह बंद झाले. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, सेन्सेक्स 354.21 (0.49%) अंकांनी घसरून 71,731.42 वर बंद झाला तर निफ्टी 82.10 (0.38%) अंकांनी घसरून 21,771.70 वर बंद झाला.
सोमवारी बाजारात बँकिंग, एफएमसीजी, आयटी आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीची नोंद झाली. दुसरीकडे, ऑटो आणि फार्मा क्षेत्रातील समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 440 अंकांच्या वाढीसह 72,085 च्या पातळीवर बंद झाला होता.





