Breaking News : खळबळजनक! दौंड शहरात दहा ते अकरा अर्भक आढळली; बेकायदा गर्भपात सेंटरची शक्यता

दौंड: दौंड शहरात मृत अवस्थेत अर्भके सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. साधारणतः दहा ते अकरा अर्भक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस शोध घेत आहेत. दौंड शहरातील बोरावके नगर परिसरात नवजात बालकांचे अर्भक मृत अवस्थेत सापडले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना कळताच दौंड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आहे. शहरात अर्भक सापडल्याने याच परिसरात गर्भपात होत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे सर्व अर्भक हे प्लास्टिकच्या डब्यात बंद केलेले असल्याचे आढळून आले आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस , सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक युवराज घोडके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देत घटनेची माहिती घेत उपजिल्हा रुग्णालयांच्या डॉक्टरांना तात्काळ येथे बोलविण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.





