ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन; इस्त्रोचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड

Eknath Vasant Chitnis | ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे आज (22 ऑक्टोबर) सकाळी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. इस्त्रोच्या जडणघडणे त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. वसंत चिटणीस यांच्या निधनाने भारतीय अवकाश संशोधनाच्या सुवर्ण इतिहासात आज एक पान काळाच्या पडद्याआड गेलं आहे.
श्रीहरीकोटा येथील अग्निबाण प्रक्षेपण केंद्राची जागा त्यांनीच निश्चित केली होती. भारताच्या अवकाश प्रवासाचे शिल्पकार, विक्रम साराभाईंचे निकटचे सहकारी आणि सॅटेलाइट टीव्हीच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोहोचवण्यात प्रा. एकनाथ वसंत चिटणीस यांचा सिंहाचा वाटा आहे.
- 1925 मध्ये कोल्हापूरमध्ये जन्मलेले प्रा. चिटणीस हे लहान वयातच अनाथ झाले. पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्रात प्रथम श्रेणीत पदवी घेतल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये सरकारी नोकरी नाकारून विज्ञानाची वाट धरली.
- 1950 मध्ये पुण्यातील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये विक्रम साराभाईंचे प्रेरणादायी भाषण ऐकून त्यांनी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (PRL) मध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कॉस्मिक किरणांवरील संशोधनासाठी सेरेन्कॉव्ह काउंटर तयार केला आणि पुढे एमआयटीमध्ये प्रा. ब्रुनो रॉसी यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.
- 1961 मध्ये साराभाईंनी भारतात परत बोलावल्यावर चिटणीस यांनी देशातील पहिली सॅटेलाइट टेलिमेट्री स्टेशन उभारली आणि थुंबा रॉकेट लॉंचिंग स्टेशनची निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
- 1963 मध्ये भारताच्या पहिल्या Nike Apache रॉकेटच्या उड्डाणाने त्यांचे स्वप्न साकार झाले.
- 1975-76 मधील सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट (SITE) ज्याद्वारे नासाच्या उपग्रहाच्या साहाय्याने सहा राज्यांतील 2,400 गावांपर्यंत शिक्षण पोहोचले. याच प्रयोगातून पुढे INSAT प्रणालीचा पाया रचला गेला आणि भारताच्या डिजिटल युगाची बीजे रुजली. नंतर ते इस्रोच्या Space Applications Centreचे संचालक झाले. Eknath Vasant Chitnis |
एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे जबाबदारी
1962 मध्ये, डॉ. चिटणीस थुंबा येथून एक्स-रे खगोलशास्त्र प्रयोग करत होते, म्हणून त्या काळात नाकाचा गाभा उघडण्याचे काम एपीजे अब्दुल कलाम यांना सोपवण्यात आले आणि त्यांनी ते काम उत्तम प्रकारे केले. त्यानंतर साराभाईंनी स्वतः त्यांना पहिल्या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे (SLV) प्रकल्प संचालकपद दिले होते. Eknath Vasant Chitnis |
हेही वाचा





