पिंपरी | नेहरूनगरमध्ये ज्येष्ठ शिवसैनिक, कोविड योद्ध्यांचा सत्कार

पिंपरी, (प्रतिनिधी) – भगवा सप्ताह शिव संकल्प अभियानांतर्गत शिवसेना (उद्धव ठाकरे) भोसरी विधानसभेच्या नेहरूनगर शाखेच्या वतीने शाखेच्या नाम फलकाचे नूतनीकरण, नेहरूनगरमधील ज्येष्ठ शिवसैनिक, कोविड योद्धा डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचार्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा समन्वयक गणेश जाधव, चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर, विभाग प्रमुख प्रदीप चव्हाण, शाखाप्रमुख प्रकाश जाधव, राजेश जाधव, शिवाजी शेळके, गुप्ता आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक समीर चव्हाण, बापू घुले, मनोहर कदम, विलास जाधव, मीरा तरासगार, संजय भालवणकर, प्रदीप बेळगावकर, संतोष करमारे, शरद उघडे आरोग्य कर्मचार्यांसह डॉ. प्रफुल गरड यांचा सत्कार करण्यात आला.
चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर म्हणाले, शिवसैनिकांनी प्रभाग स्तरावर शाखा मजबूतीकरणासाठी प्रयत्नशील रहावे. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक शासकीय योजना जनसामान्यांसाठी राबविल्या आहेत.
त्याची जनजागृती नव्याने करावी. मतदार नोंदणीसाठी आग्रही असावे. शाखाप्रमुख, गटप्रमुख यांनी कार्यकर्त्यांमधील दुवा म्हणून काम करावे. जेणेकरून आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत त्याचा पक्षाला फायदा होईल आणि आपलं संख्याबळ वाढेल.
भोसरी विधानसभा समन्वयक गणेश जाधव यांनी शिवसेनेच्या बांधणीपासून शिवसेनेच्या समाजकार्याची विस्तृतपणे माहिती सांगितली.
चिन्मय जाधव, सिद्धार्थ धाकल, निखिल शिंदे, सौरभ प्रजापती, सौरव शिलवंत, विश्वजीत गायकवाड, भारत वाघमारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बेळगावकर यांनी तर, आभार शाखाप्रमुख प्रकाश जाधव यांनी मानले.





