Satara | शिवसैनिकांचा सन्मान राखावा : निलेश मोरे

सातारा, (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले तसेच विधानसभेलाही करणार आहेत.
मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसैनिकांना न डावलता त्यांचा योग्य सन्मान राखावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख निलेश मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. आगामी विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सूचनेनुसार जिल्ह्यातील मित्र पक्षांच्या उमेदवारांचे प्रामाणिकपणे काम केले जाणार आहे.
मात्र, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यासह इतर समित्यांमध्ये शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांचा महायुतीतील घटक पक्षांनी योग्य सन्मान राखावा.
महायुतीच्या कार्यक्रमांमध्ये शिवसैनिकांना विचारात घेण्यात यावे अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यात योग्य तो निर्णय घ्यावा लागेल, असेही निलेश मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.





