नेवासे : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या महापारेषण वीज कंपनी ही एक राज्यातील अग्रगण्य नावलौकिक कंपनी असून या कंपनीमध्ये अजिंक्य राजे हे सहाय्यक अभियंता या पदावर नुकतेच काही महिन्यापूर्वी कार्पोरेट ऑफिस मुंबई येथे कामावर हजर झालेले आहेत. परंतु एक महिन्यापूर्वीच दादर स्टेशन येथे ते पाय घसरून पडल्यामुळे गंभीर दुखापत होवून त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला होता आणि ते नव्यानेच हजर झाल्यामुळे किरकोळ रजा सुट्ट्या या पुरेश्या शिल्लकही नव्हत्या. अशा या परिस्थितीमध्ये संबंधित सहाय्यक अभियंता हे खाजगी चार चाकी वाहन करून पदरमोड करून आपले कर्तव्य प्रामाणिक पणे निभावत होते. अजिंक्य रहाणे हे सहाय्यक अभियंता प्रकाश गंगा या कार्पोरेट ऑफिसमध्ये पायाला दुखापत झाल्यामुळे आधारासाठी काठी घेऊन कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या कार्यकारी संचालक श्रीमती सुचिता भिकाने यांनी त्यांना पाहिले त्यांची ती अवस्था बघून त्यांनी संबंधित सहाय्यक अभियंता यांची आस्थेने विचारपूस केली व आपल्या कक्षामध्ये त्यांना येण्याचे सांगितले. तेव्हा सहाय्यक अभियंता अजिंक्य राजे यांनी आपली शारिरिक व्यथा सांगितली त्यांचे मूळ गांव हे लातूर आहे आणि ते एकटेच मुंबई येथे राहत होते या अपघातामुळे आजारपणामध्ये स्वतःची शारिरिक काळजी ते एकटेच घेत होते. त्यांना आजारपणात मदतीसाठी कुटुंबातील सदस्यांची आवश्यकता होती. कार्यकारी संचालक श्रीमती सुचिता भिकाणे यांनी सर्व बाजूने विचार करून त्यांना काही काळासाठी त्यांच्या मूळ गावी प्रतिनियुक्ती देण्याचे आदेश लगोलग दिले आणि आपल्या माणूसकीचे दर्शन घडविले. मानव संसाधन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक राजू गायकवाड यांनी वेळात वेळ काढून मानवतेच्या भावनेतून मोलाची भूमिका पार पाडली तसेच संबंधित प्रतिनियुक्ती देण्यासाठी कंपनीचे संचलन विभागाचे संचालक सतीश चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. या महापारेषण विद्युत कंपणीच्या प्रशासनाने आपल्या आजारी अपघातामुळे कर्मचाऱ्याप्रती असलेली तळमळ व मानवतेपोटी घेतलेला एक चांगली सहानुभूती घेतलेला निर्णय हा चर्चेचा विषय ठरला. यामुळे कर्मचारी व अधिकारी वर्गामध्ये प्रचंड आनंदी वातावरण निर्माण झालेला आहे. या निर्णयामुळे महापारेषण कंपनी ही आपली कुटुंबीयासारखीच आपली काळजी घेत असल्याची भावना कर्मचारी वर्गामध्ये निर्माण झालेली आहे. यामुळे प्रशासन कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचा आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोनाच्या माध्यमातून एक पाऊल पुढे उचलले गेलेले आहे. आता महापारेषणची प्रकाशगंगा ही एक आठ माळ्याची केवळ निर्जीव इमारत नसून ती कर्मचाऱ्यांच्या भावना वेदना समजावून घेणारी माध्यम बनलेली आहे, असे गौरोद्गारही अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक श्रीमती सुचिता भिकाने यांनी व्यक्त केले. मानवते पोटी घेतलेल्या भूमिकेचे महापारेषान कंपणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या निर्णयामुळे सर्व स्थरातून अभिनंदन केले जात आहे.