Pune : पेठांसह शिवाजीनगर, डेक्कन भागांत आज वीजपुरवठा बंद

पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील मेट्रो व महापारेषणच्या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांचे काम केले जाणार आहे. यासाठी महावितरणच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि. १ ) सकाळी ८ ते दुपारी उशिरापर्यंत प्रामुख्याने शिवाजीनगरसह डेक्कन परिसरांत वीजपुरवठा बंद राहणार आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. या मार्गावरील महापारेषणच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी २२०/१३२ केव्ही गणेशखिंड व चिंचवड अतिउच्चदाब उपकेंद्र आणि कोथरूडमधील जीकेआरएस उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे महावितरणकडून शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरात वीज पुरवठा बंद केले जाणार आहे.
गणेशखिंड, मॉडेल कॉलनी, दीप बंगला परिसर, वडारवाडी, गोखलेनगर, जनता वसाहत, एमआयजी कॉलनी, वैदूवाडी, जनवाडी, वेताळबाबा चौक, मंगलवाडी, सेनापती बापट मार्ग, रमणबाग चौक, न्यू मराठी स्कूल, नारायणपेठ, शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रस्ता, रोकडोबा मंदिर परिसर, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर चौक, पोलीस लाइन वसाहत, घोले रोड, मॉडर्न कॉलेज, विजय टॉकीज, रेवेन्यू कॉलनी, सिमला ऑफिस, आकाशवाणी, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, मेट्रो स्टेशन, संचेती हॉस्पिटल, ठुबे पार्क, औंध गाव, सिद्धार्थनगर, परिहार चौक, ब्रेमेन चौक, संघवी रस्ता, ओम सुपर मार्केट, थोरात चौक, वाकडेवाडी, साखर संकुल रस्ता, चापेकरनगर, आकाशवाणी कॉलनी, राहुल थिएटर, खैरेवाडी, दळवी हॉस्पिटल, अशोकनगर, रेंज हिल्स रस्ता, काकडे मॉल, मोदीबाग, चव्हाणनगर तसेच आपटे रोड, रुपाली गल्ली, शिरोळे रस्ता, घोले रस्ता, पुलाची वाडी, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, फर्गसन महाविद्यालय रस्ता, वैशाली हॉटेल, सुतारदरा, शिवतीर्थनगर, साम्राज्यनगर, शिक्षकनगर, जयभवानीनगर, किष्किंधानगर आदी परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे.





