अॅप बंदमुळे ज्येष्ठ नागरिक ताटकळले
Updated On:

येरवडा – स्व.राजीव गांधी रुग्णालयात लस घेण्यासाठी सकाळी 9.30 पासून नागरिक ताटकळत बसले. ज्येष्ठ नागरिक तसेच ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे, अशांना करोना लस घेण्यासाठी बोलावण्यात आले होते.
सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावलेल्या होत्या. मात्र, सर्व्हर डाउन असल्याने नावे समजत नसल्याने डोस देता येत नव्हते.
दरम्यान, “आम्ही सकाळी दोन तासांपासून अधिक वेळ रुग्णालयात होतो. कोणीच काही सांगायला तयार नव्हते. सर्व्हर डाउन असल्याचे सिक्युरिटीकडून समजले. आम्हाला माहिती मिळाली असती तर रुग्णांना सांगितले असते,’ असे येथील डॉ. चंद्रा यांनी सांगितले.





