Pune News : लिफ्टमध्ये अडकलेल्या जेष्ठ नागरिकाची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

पुणे: काल २६ मे रात्री १२ वाजता मार्कटयार्ड येथील नंदनवन हॉटेल व लॉजिंग येथे चार मजली इमारतीत दुसर्या मजल्यावर एक जेष्ठ नागरिक लिफ्ट बंद पडल्याने सुमारे अर्धा तास अडकल्याची माहिती गंगाधाम अग्निशमन केंद्राला मिळाली. त्यानंतर या ठिकाणी तातडीने अग्निशमल दलाचे वाहन रवाना करण्यात आले.
जवान घटनास्थळी पोहचताच प्रथम लिफ्टमध्ये अडकलेल्या जेष्ठ नागरिकाशी संवाद साधत त्यांची लवकरच सुटका करू, असा धीर देत वर लिफ्ट रूममधून काही जवानांनी मॅन्युअली फिरवत एकमेकांशी चर्चा करत लिफ्टमधून सदर जेष्ठ नागरिकाची अवघ्या ५ मिनिटात सुखरूप सुटका करत आपले कर्तव्य बजावले. अगदी वेळेत अग्निशमन दल पोहचत केलेल्या कामगिरीबद्दल जेष्ठ नागरिक हॉटेल मॅनेजर रवी कासेगावकर यांनी जवानांचे आभार मानले.
या कामगिरीत गंगाधाम अग्निशमन केंद्रातील तांडेल मनीष बोंबले, वाहनचालक प्रसाद शिंदे व जवान ज्ञानेश्वर कदम, अक्षय मोंढे, धनंजय भिसे, मंदार नलावडे, अजित टेकावडे यांनी सहभाग घेतला होता.




