BJP News : भाजपच्या बड्या नेत्याचं निधन; राजकीय वर्तुळातून हळहळ
BJP News : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, मुजफ्फरपूरचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच बिहार प्रदेश भाजपचे माजी उपाध्यक्ष रवींद्र प्रसाद सिंह यांचे दुर्दैवी निधन झाले आहे.

BJP News : भारतीय जनता पक्षाचे मुजफ्फरपूरचे माजी जिल्हाध्यक्ष आणि बिहार प्रदेशचे माजी उपाध्यक्ष रवींद्र प्रसाद सिंह यांच्या निधनाने भाजप परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून दुःख व्यक्त करण्यात येत असून, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. (BJP News)
भाजपने अनुभवी संघटक गमावला
भाजप नेते मनीष कुमार यांनी रवींद्र प्रसाद सिंह यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. सिंह हे पक्षाचे महत्त्वाचे संघटक होते. त्यांनी संघटनात्मक कामांसोबतच सामाजिक क्षेत्रातही सक्रिय योगदान दिले. मनमिळाऊ स्वभाव आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते, अशा शब्दांत कुमार यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. (BJP News)
सामाजिक कार्यातील योगदानाची आठवण
रवींद्र प्रसाद सिंह यांचे निधन हे पक्षासह समाजासाठी मोठे नुकसान असल्याची भावना मनीष कुमार यांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनामुळे भाजपने एक अनुभवी संघटक गमावला असून, पक्ष आणि समाजासाठी त्यांनी केलेले कार्य दीर्घकाळ स्मरणात राहील, असेही त्यांनी नमूद केले. (BJP News)
शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना
या दुःखद प्रसंगी रवींद्र प्रसाद सिंह यांच्या कुटुंबीयांना आणि कार्यकर्त्यांना दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थना मनीष कुमार यांनी केली. त्यांच्या निधनाने बिहारमधील भाजपच्या राजकीय आणि संघटनात्मक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. (BJP News)
BJP Leader : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा






