मुंबई – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ “दिलीप कुमार’ (Dilip Kumar) यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान, त्यांनी आज पहाटे 7 वाजून 30 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना रुग्नायालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यापासूनचं त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते.पण, आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांनी भारतीय सिनेमात अभिनयाचे अंग आणण्याचे श्रेय दिलीप कुमार यांच्याकडे जाते. पहिला फिल्मफेअर पुरस्कार पटकावत सर्वोत्कृष्ठ नायक या वर्गात सर्वाधिक पुरस्कार मिळवणारे नायक म्हणून त्यांचा विक्रम आहे. बॉलीवूड आणि जागतिक चित्रपट सृष्टीतील सर्वात महान कलाकार म्हणून ते ओळखले जातात. बॉम्बे टॉकिजने निर्माण केलेल्या ज्वारभाटा या चित्रपटाने त्यांनी सिनेसृष्टीत 1944 मध्ये पदार्पण केले. तब्बल पाच दशक आपली अभिनयाची कारकीर्द सजवणाऱ्या या नायकाने तब्बल 65 चित्रपटांत आपला ठसा उमटवला. अंदाज (1949), आन (1952), दाग (1952) आणि देवदास (1955) या चित्रपटांतून त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या भूमिका साकारत आपल्यातील अभिनेत्याचा कस जोखला. आजही प्रेक्षकांकडून त्यांच्या भूमिकांना आणि चित्रपटांना दाद दिली जाते त्यांचे टॉप चित्रपट पुढील प्रमाणे #gallery-1 { margin: auto; } #gallery-1 .gallery-item { float: left; margin-top: 10px; text-align: center; width: 33%; } #gallery-1 img { border: 2px solid #cfcfcf; } #gallery-1 .gallery-caption { margin-left: 0; } /* see gallery_shortcode() in wp-includes/media.php */ दिलीप कुमार यांचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे मुघल- ए- आजम. या चित्रपटामध्ये दुर्गा खोटे, दिलीप कुमार, पृथ्वीराज कपुर यांनी काम केले होते. हा चित्रपट1960 मध्ये प्रदर्शित झाला होता. 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या राम और श्याम या चित्रपटाचे दिग्दर्शन तापी चाण्यक्य यांनी केले होते. दिलीप कुमार, प्राण, वहिदा रेहमान, मुमताज, निरूपा रॉय या दिग्गज कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केले आहे. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या क्रांती या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटातील मेरे देश की धरती हे गाणे खूप लोकप्रिय झाले. दीदार या चित्रपटामधील दिलीप कुमार आणि अशोक कुमार या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटाचे कथानक एका तरूण मुलाच्या आय़ुष्यावर आधरित आहे. ‘गंगा जमना’ हा चित्रपट 1961 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची लेखन आणि निर्मिती स्वत: दिलीप कुमार यांनी केली होती. वैजंतीमाला आणि दिलीप कुमार यांनी या चित्रपटामध्ये अभिनय केला होता. देवदास या चित्रपटामधील दिलीप कुमार यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बिमल रॉय यांनी केले आहे. हा चित्रपट 1955मध्ये प्रदर्शित झाला.