सेंगोलचा वाद! कपिल सिब्बल म्हणाले,”तुम्ही सांगत असलेला सेंगोलचा अर्थ आम्ही स्विकारू शकत नाही”

नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटना अगोदरपासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता कपिल सिब्बल यांचे एक ट्वीट चर्चेत आले आहे. राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी भाजपला सल्ला देताना सेंगोलचा खरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
कपिल सिब्बल यांनी,’तुम्ही समजताय तसा सेंगोलचा अर्थ नाहीये, असे म्हणत कपिल सिब्बल यांनी ट्वीट करुन भाजप नेत्यांना सांगितलं आहे. तसेच, खरं तर तुम्हाला सेंगोलचा खरा अर्थ जाणूनच घ्यायचा नाहीये, असंही कपिल सब्बल म्हणाले. तुम्ही सांगत असलेला सेंगोलचा अर्थ आम्ही स्विकारू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
कपिल सिब्बल यांनी नवीन संसद भवनाचं उद्घाटन केल्यानंतर त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं की, भारतीय जनता पक्षाचे नेते सेंगोलला ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरणाचा समानार्थी शब्द मानतात. मात्र, तसं नाही. शक्य असल्यास तुम्ही माझं म्हणणं ऐका, असे त्यांनी म्हटलं आहे. भारतात सत्तेचे हस्तांतरण त्या लोकांच्या इच्छेनं झालं ज्यांनी स्वतःला हे संविधान दिले. देवी मीनाक्षी यांनी मदुराईच्या राजाला भेट दिलेलं सेंगोल हे राज्य करण्याच्या दैवी अधिकाराचं प्रतीक होते.
Sengol :
BJP says :
Symbol of transfer of power from the British.My take :
In India transfer of power through Will of the people who gave to themselves this constitutionSengol presented by Goddess Meenakshi to king of Madurai. Symbolises Divine right to rule
— Kapil Sibal (@KapilSibal) May 28, 2023
तीन दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी आपल्या ट्वीटमध्ये संसद हे आपल्या प्रजासत्ताकाचे प्रतीक असल्याचे लिहिले होते. राष्ट्रपती हे प्रजासत्ताकाचे प्रमुख असतात. या औपचारिक कार्यक्रमात राष्ट्रपतींची अनुपस्थिती म्हणजे, आपल्या प्रजासत्ताकाच्या लोकाचाराचा अपमान करण्यासारखं आहे, असं कपिल सिब्बल म्हणाले.
तसेच, त्यांनी केंद्र सरकारला याची काळजी आहे का? असा प्रश्नही विचारला आहे. दरम्यान, कपिल सिब्बल यांनी तीन दिवसांपूर्वीच यावर प्रश्न उपस्थित केला होता. आज त्यांनी सेंगोलचा अर्थ सांगून भाजपला सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असलेल्या सेंगोलचा अर्थ आम्ही स्वीकारू शकत नाही, असं यावेळी सिब्बल यांनी भाजपला सूचित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (28 मे 2023) सकाळी संसदेची नवी इमारत देशाला समर्पित केली. मात्र, यावरुन अजुनही राजकारण सुरूच आहे.




