पुणे विभाग सदस्यपदी चौघांची निवड
Updated On:

माने, केंगार, कदम, वाघेलांना संधी
बारामती – भारत सरकार रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे पुणे विभाग सदस्य म्हणून बारामती येथील भाजपचे अँड. डी. जे. माने, चंद्रकांत केंगार, शहाजी कदम, मुकेश वाघेला यांची निवड करण्यात आली.
रेल्वे वाहतूक, प्रवासी गैरसोय, प्रवासी हित, सामान्य सार्वजनिक हित, सार्वजनिक सोय तसेच स्थानकातील प्रवासी सेवा, सोय, अडचण आदीबाबत रेल्वे विभाग यांचे बरोबर ही कमिटी कार्यरत राहणार आहे.
रेल्वे प्रवास, स्टेशन सुविधा, प्रवासी गैरसोय आदींबाबत काही अडचण असल्यास या कमिटीशी संपर्क करण्याचे आवाहन कमिटी सदस्य यांनी केले आहे.





