नवी दिल्ली – पाकिस्तानी महिला सीमा हैदर गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. सीमासोबत भारतीय सचिनही सतत चर्चेत असतो. तूर्तास सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असल्याच्या चर्चा संपुष्टात येऊ लागल्या आहेत. तपास यंत्रणांना सीमाबाबत असे कोणतेही पुरावे अद्याप तरी मिळालेले नाहीत, ज्यामुळे ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचे सिद्ध होऊ शकेल. अशात सीमा सचिनबाबत अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.
गुप्तचर यंत्रणांनी त्यांचा तपास अहवाल सरकारला पाठवला आहे. सीमाला पाकिस्तानात पाठवण्याची देखील चर्चा आहे. तपास यंत्रणांकडून सीमा हैदरच्या विरोधात कोणतेही पुरावे मिळाले नसले तरी सीमा आणि तिच्या पतीला उदरनिर्वाहाची चिंता आहे.
पाकिस्तानी महिला सीमा हैदरच्या सुरक्षेमुळे सचिनला पोलिस प्रशासनाने नजरकैदेत ठेवल्याने त्याच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. महिनाभरापासून कमाई न होऊ शकल्याने कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे राहिले आहे. अशात सीमा हैदरबाबत एक नवी चर्चा सुरु झाली आहे.
सीमा हैदर गरोदर असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. पाकिस्तानी महिलेच्या पोटात पाचवे मूल वाढत असल्याचा दावा काही हिंदी तसेच इंग्रजी माध्यमांनी केला असल्याने खळबळ उडाली आहे. सचिनही तपासणीसाठी गेला होता, त्यामुळे सीमा प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
पबजी गेमपासून सुरू झाली प्रेम कहाणी
पाकिस्तानातील कराची येथील रहिवासी सीमा हैदर पबजी गेम खेळत असताना रबुपुरा येथील रहिवासी सचिनच्या संपर्कात आली आणि दोघेही प्रेमात पडले. त्याचे प्रेम मिळवण्यासाठी सीमा हैदरने 13 मे रोजी बेकायदेशीरपणे भारताच्या हद्दीत प्रवेश केला आणि राबुपुरा येथे राहू लागली.पोलिसांनी 6 जुलै रोजी सीमा आणि सचिनला अटक केली. सीमा दीड महिना बेकायदेशीरपणे राबूपुरा येथे राहिली आणि स्थानिक एजन्सीला सुगावाही लागला नाही. कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर आता ती रबुपुरा येथील सचिनच्या घरी राहत आहे.