प्रियकरासाठी पाकिस्तातून भारतात आलेली सीमा हैदर म्हणते,”क्रिकेटचा देव आवडत नाही ‘हा’ खेळाडू आवडतो

नवी दिल्ली – प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत, त्याबाबत सीमा म्हणाली की, कृपया माझ्याबद्दल अफवा पसरवू नका. मी फक्त सचिनसाठी इथे आली आहे. भारतात येण्यामागे दुसरा उद्देश नाही. सीमा हैदरबाबत सोशल मीडियावर विविध गोष्टी चर्चिल्या जात आहेत. कोणी तिला गुप्तहेर म्हणत आहे तर कोणी तिला फसवणूक करणारी बायको म्हणत आहेत. अशात सीमाने आणखी एक मोठा खुलासा केला आहे.
सीमा केवळ क्रिकेट वर्ल्डकपसाठीच भारतात आली होती, असा दावाही पाकिस्तानातून करण्यात आला होता. विश्वचषक संपताच ती पती गुलाम हैदरकडे परत येईल अशा देखील चर्चा सुरु होत्या. सीमा म्हणाली की, जे लोक म्हणत आहेत की मी क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतात आले आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे, मला क्रिकेट आवडते पण तितके नाही असा खुलासा सीमाने यावेळी केला.
पाकिस्तानी महिला सीमाने सांगितले की, काही लोक म्हणत आहेत की मी या सचिनवर प्रेम केले कारण मला सचिन तेंडुलकर आवडतो, ज्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते. त्यामुळे मी त्या लोकांना सांगू इच्छितो की, माझा आवडता क्रिकेटर सचिन तेंडुलकर नसून विराट कोहली आहे. विराट कोहलीचे काय, संपूर्ण पाकिस्तानला तो आवडतो. मला त्याचा लूक, स्टाइल आणि क्रिकेट खेळण्याची पद्धत खूप आवडते असं सीमा म्हणते.
सचिन आणि सीमाचे पुष्पहार घातलेले फोटो शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. नेपाळमधील काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात लग्न झाल्याचा दावा सचिन सीमाने केला आहे. मात्र, व्हायरल झालेले फोटो कुठले आहेत याची पुष्टी झालेली नाही. काही लोक हे फोटो रबुपुराचे असल्याचा दावा करत आहेत.
अशी सुरुवात झाली
सीमा आणि सचिनची भेट पबजी गेमदरम्यान झाली होती. यानंतर दोघे प्रेमात पडले. देशाची बॉर्डर ओलांडून प्रियकराला भेटण्यासाठी सीमाने पाकिस्तानातील घर विकले. याच पैशातून सीमा नेपाळमार्गे भारतात येण्यात यशस्वी झाली. सचिन मीनाही आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी नेपाळला गेला आणि काठमांडूमध्येच हिंदू रितीरिवाजांनुसार दोघांनी लग्न केले.





