शेततळ्यात बुडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू
Updated On:

यवत (ता.दौंड) – येथील डेक्कन एक्स्पलोटेक (दारुगोळा) प्रा.लि. या कंपनीतील एक २८ वर्षीय तरुण कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत असताना कंपनीच्या आवरामध्ये असलेल्या शेततळ्यात पडून सोमवार (दि.१७) रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाची घटना घडली.
सविस्तर माहिती अशी कि, कासुर्डी(ता.दौंड) येथील अमोल शेषराव शिंदे, (वय – २८रा.कासुर्डी,ता.दौंड) हा डेक्कन एक्स्पलोसिव्ह(दारुगोळा)प्रा.लि कंपनीमध्ये मागील दोन वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून कामास होता. तो रात्रीच्या सुमारास शेततळ्यावरील पाण्याचा वोल्व बंद करण्यासाठी तळ्यावर गेला असता तळ्यात पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुढील तपास यवत पोलीस करत आहे.





