छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील शिल्प प्रदर्शन”पीएनजी सन्स’च्या “गार्गी’ ब्रॅंडतर्फे चिंचवडमध्ये आयोजन

पिंपरी – “गार्गी’ या “पीएनजी सन्स’च्या ब्रॅंडतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून, त्याचे उद्घाटन शनिवारी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पीएनजी सन्सचे विवेक जोशी, स्मिता मुधोळ, पुष्पा नाईक, मंदार कुलकर्णी, ओंकार भिडे, प्रसाद घोडके, शिल्पकार आश्विन कदम उपस्थित होते.
कदम यांनी यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पांचे प्रदर्शन चिंचवडमधील चापेकर चौकाजवळील पीएनजी सन्सच्या दालनात 1 मेपर्यंत सुरू राहील.
येथे शिवाजी महाराज यांची 14 विविध शिल्पे ठेवण्यात आली असून, प्रत्येक कलाकृतीची रचना वेगळी आहे. “जाणता राजा’ व “श्रीमंत योगी’ ही दोन प्रमुख शिल्पे असून, यातील एक कृष्ण, तर दुसरी सोनेरी रंगात आहे. संपूर्ण शिल्प 28 भागांमधून साकारले असून, हाव-भाव, बैठक, वस्त्रे, सिंहासन यांच्यावर विशेष काम केले असल्याचे कदम यांनी सांगितले.
ग्राहकांना उत्तमोत्तम शिल्पे देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला असून, त्याचाच एक भाग म्हणून कदम यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध शिल्पांचे प्रदर्शन भरवत आहोत.
– आदित्य मोडक, संचालक, “गार्गी’ ब्रॅंड, पीएनजी सर्न्सीं





