निवडणुकीच्या निकालापूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मोठा दावा, ‘निकाल आल्यावर…’

Scindia on Lok Sabha । लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा 1 जून रोजी पार पडत आहे. त्यानंतर 4 जून 2024 रोजी केंद्रात कोणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि गुना येथील भाजपचे उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी ‘जेव्हा 4 जूनला निकाल येईल, तेव्हा जागतिक पटलावर भारताचा झेंडा फडकेल.’असे म्हटले आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी निकालावर भाष्य करताना मोठा दावा करताना पुन्हा एकदा केंद्रात भाजपचे सरकार येणार असं म्हटलं आहे. सिंधिया यांनी याविषयी बोलताना, “लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी १ जूनला मतदान आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने या शेवटच्या टप्प्यात आपला मताधिकार वापरावा. ४ जूनला निकाल आल्यावर भारताचा झेंडा फडकवेल. जागतिक मंचावर पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या डावात आपण सर्वजण 2027 पर्यंत भारताला तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पुढे जाऊ.
सातवा टप्पा 2024 1 जून रोजी Scindia on Lok Sabha ।
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. याच टप्प्यात पंतप्रधान मोदींच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. याआधी, तामिळनाडूच्या कन्याकुमारीमध्ये पंतप्रधान ४५ तासांच्या ध्यानात गढून गेले होते.
मध्य प्रदेशात चार टप्प्यात निवडणुका Scindia on Lok Sabha ।
मध्य प्रदेशमध्ये चार टप्प्यात मतदान पार पडले. 19 एप्रिल ते 13 मे दरम्यान लोकसभेच्या सर्व 29 जागांवर मतदान झाले. ज्योतिरादित्य सिंधिया यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या गुना येथे तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान झाले. भाजपचे उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या विरोधात काँग्रेसने राव यादवेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे. 4 जून रोजी दोघांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.





