School Shooting in Philippines : फिलिपीन्समध्ये हायस्कूलमध्ये गोळीबार; 3 जण ठार
शुक्रवारी दक्षिण फिलीपिन्समधील एका हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात (School Shooting in Philippines) १४ वर्षीय दोन विद्यार्थी आणि एक किशोरवयीन बंदूकधारी ठार झाले, तर किमान आठ जण जखमी झाले.

School Shooting in Philippines : शुक्रवारी दक्षिण फिलीपिन्समधील एका हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात (School Shooting in Philippines) १४ वर्षीय दोन विद्यार्थी आणि एक किशोरवयीन बंदूकधारी ठार झाले, तर किमान आठ जण जखमी झाले.
दक्षिण कोटाबाटोमधील बंगा शहरातील बंगा नॅशनल हायस्कूलमध्ये झालेल्या या गोळीबाराची (School Shooting in Philippines) चौकशी सुरू आहे, असे फिलिपिन्स राष्ट्रीय पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी परिसर सुरक्षित केला आणि शाळा अधिकारी व वैद्यकीय पथकांशी समन्वय साधला, असे निवेदनात म्हटले आहे.
ठार झालेले दोन विद्यार्थी एक मुलगा आणि एक मुलगी होते, दोघेही १४ वर्षांचे होते. बंदूकधाऱ्यानेही स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि त्याचा मृत्यू झाला, असे दक्षिण कोटाबाटोचे गव्हर्नर रेनाल्डो तामायो यांनी सांगितले. बंदूकधाऱ्याने त्याच्या शेजारच्या वर्गातील १० विद्यार्थ्यांना गोळ्या घातल्या, त्यांपैकी दोघांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले.
धाप लागलेल्या एका व्यक्तीलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे बंगा शहराचे महापौर अल्बर्ट पालेन्सिया यांनी सांगितले. गोळीबार करणारा किशोरवयीन मुलगा एका ऑनलाइन खऱ्या गुन्हेगारी समुदायाचा सदस्य होता, असे बंदूकधाऱ्याच्या जिवलग मित्राने अधिकाऱ्यांना सांगितले. दुपारच्या जेवणाच्या सुटीनंंतर या मुलाने आपल्या मित्राला घरी जाण्यास सांगितले होते. त्याने शाळेत गोळीबाराची योजना आदोरच निश्चित केली होती, हे सिद्ध होते.
या अनुषंगाने अधिकारी या मुलाच्या पार्श्वभुमीचा तपास करत आहेत. या पार्श्वभुमीचा या गोळीबाराशी (School Shooting in Philippines) काही थेट संबंध आहे का, हे देखील तपासून बघितले जात आहे. या मुलाकडील बंदूक त्याच्या वडिलांच्या नावे नोंदणी झालेली होती. कपाट फोडून मुलाने ही बंदूक मिळवली होती.





