Explosion in Firecracker Factory : एअर फोर्स स्टेशनजवळील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 6 जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात सोमवारी दुपारी फटाक्यांच्या कारखान्यात (Explosion in Firecracker Factory) झालेल्या भीषण स्फोटात ६ कामगारांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Explosion in Firecracker Factory : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात सोमवारी दुपारी फटाक्यांच्या कारखान्यात (Explosion in Firecracker Factory) झालेल्या भीषण स्फोटात ६ कामगारांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी प्रयागराज येथील एसआरएन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मात्र, कारखान्यातील आग पूर्णपणे विझवल्यानंतरच दुर्घटनेची व्याप्ती आणि जीवितहानीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, घटनास्थळापासून मनोरी हवाई दल केंद्र (एअर फोर्स स्टेशन) फक्त दोन किलोमीटर (Explosion in Firecracker Factory) अंतरावर आहे. प्रयागराजमधील मनौरी परिसरात सोमवारी दुपारी फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागून एकामागून एक जोरदार स्फोट झाले.
या स्फोटांची तीव्रता इतकी मोठी होती की, परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून काही घरे अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास फटाक्यांच्या कारखान्यात आग लागली. त्यानंतर तब्बल तासभर फटाक्यांचे जोरदार स्फोट सुरू होते.
अचानक झालेल्या या स्फोटांमुळे आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. ज्या इमारतीत फटाके तयार केले जात होते, त्याच्या जवळच बूंदीचा कारखाना आणि आटा चक्की होती. बूंदीच्या कारखान्यात पाच, तर आटा चक्कीत सहा जण उपस्थित असल्याची माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणीही मोठी जीवितहानी झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पूरामुफ्ती आणि पिपरी पोलीस ठाण्याच्या पथकांसह अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. आग पूर्णपणे विझल्यानंतर (Explosion in Firecracker Factory) ढिगारा हटवून अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. यासाठी बुलडोझरच्या मदतीने मलबा हटवण्याचे कामही सुरू आहे.





