Pune Crime : मगरपट्टा ब्रिजजवळ शाळेच्या बस चालकाची टेम्पोचालकाला मारहाण
Updated On:

पुणे : पुण्यातील मगरपट्टा ब्रिज परिसरात शाळेच्या बस चालकाने टेम्पोचालकाला बेदम मारहाण करून रस्त्यावर दहशत निर्माण केल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.
बस क्रमांक एमएच-१४ एमएम-९८३७ या वाहनाचा चालक सुरज रमेश पाटील ( ३२, रा. पिंपरी चिंचवड) याने आपले वाहन बेदरकारपणे चालवून, टेम्पो क्रमांक एमएच-१४ केए-०९१० च्या चालकाला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. यानंतर त्याने बसमधील लोखंडी टामीने टेम्पोच्या समोरील काच फोडून वाहनाचे नुकसान केले.
या प्रकारामुळे सार्वजनिक रस्त्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, आरोपी सुरज पाटील यास ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





