शाळा व महाविद्यालयीन मुलींना स्कूल बॅगमध्ये स्वसंरक्षणाच्या वस्तू ठेवण्यास परवानगी द्यावी

शिरूर : राज्यामध्ये मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून २ दिवसापुर्वी बदलापूर येथील घडलेल्या संतापजनक घटनेने सर्वत्र सरकार विरुध्द रोष व्यक्त केला जात आहे. शाळेमधील कर्मचारीच जर अशाप्रकारे अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार असतील तर कायद्याचा धाक राहिलाय कुठे? हा प्रश्न आहे. यामध्येच या आरोर्पीना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी न्यायव्यवस्थेमध्ये बराच कालावधी लागतो.
अशामुळे दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत आहे. शालेय अल्पवयीन मुली व महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांना आता आपल्या स्वसंरक्षणाची गरज असून यासाठी सरकारने मुलींच्या स्कूल बॅगमध्ये स्वसंरक्षणाच्या वस्तू ठेवण्यास परवानगी द्यावी. यामुळे अत्याचार होणाऱ्या भगिणीला न्यायाचा ऑन द स्पॉट निर्णय घेता येईल.
राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता शाळा महाविद्यालयातील मुलींना स्कुल बॅग मध्येच स्वसंरक्षणाच्या वस्तु ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी भुमीपुत्र प्रतिष्ठानने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.याबाबतचे निवेदन शिरुर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले आहे.





